अखेरच्या टप्प्यात क्षीरसागर बंधूंचा मास्टरस्ट्रोक:आ.सतीश चव्हाणांच्या प्रचारार्थ आज पदवीधरांचा मेळावा

मोठ्या संख्येने उपस्थित रहा-जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे जिल्हा प्रमुख सचिन मुळूक

बीड दि.28 (प्रतिनिधी)ः- महाविकास आघाडीचे शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आ.सतीश चव्हाण यांच्या प्रचारार्थ आज रविवार दि.29 रोजी सिंहगड लॉन्स येथे पदवीधर मतदारांचा मेळावा आयोजीत करण्यात आला असून प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर आणि नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांच्या मास्टरस्ट्रोकमुळे आ.चव्हाणांच्या विजयाचा मार्ग मोकळा होणार आहे. या मेळाव्यास पदवीधर मतदार, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे जिल्हा प्रमुख सचिन मुळूक यांनी केले आहे.


औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक 2020 शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार सतीश भानुदास चव्हाण यांच्या प्रचारार्थ आज रविवार दि.29 रोजी शहरातील सिंहगड लॉन्स डी.पी.रोड येथे दुपारी 12.00 वा. भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. निवडणूक प्रचाराच्या काळात क्षीरसागर बंधूंची नेमकी कोणती भूमिका असेल याबाबत तर्क वितर्क व्यक्त केले जात होते. आ.चव्हाण यांच्या प्रचाराचा अंतिम टप्पा असतानाच क्षीरसागर बंधूंनी मेळावा घेऊन मोठे मताधिक्य त्यांच्या पारड्यात टाकण्याचा निश्‍चय केला आहे. आज होणार्‍या या मेळाव्यास शिवसेना नेते खा.चंद्रकांत खैरे, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, माजी आमदार व सहसंपर्क प्रमुख बदामराव पंडित, नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर तसेच अनेक मान्यवरांची व पदाधिकार्‍यांची उपस्थिती राहणार आहे. या मेळाव्यास शिवसेनेचे आजी माजी पदाधिकारी तसेच पदवीधर मतदारांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे व सचिन मुळूक यांनी केले आहे.


error: Content is protected !!