बीड

बँकिंग क्षेत्र व औद्योगिक क्षेत्रातील नेतृत्व गमावले-माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर

बीड- औद्योगिक क्षेत्राची प्रगती व्हावी यासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे आणि तरुणांना उद्योजकांना योग्य मार्गदर्शन करून औद्योगिक क्षेत्रासाठी सक्रिय राहून बँकिंग क्षेत्रात विश्वास संपादन करणारे नेतृत्व म्हणून अर्जुनराव जाहेर पाटील होते बँकिंग क्षेत्रात व औद्योगिक क्षेत्रातील एक नेतृत्व गमावले असल्याची भावना माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी व्यक्त केली आहे

आज छत्रपती राजश्री शाहू अर्बन बँकेचे अध्यक्ष अर्जुनराव जाहेर पाटील यांच्या निधनाची वार्ता समजल्यानंतर माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी आपल्या शोकभवना व्यक्त केल्या आहेत,ते म्हणाले की बँकिंग क्षेत्रात व औद्योगिक क्षेत्रात असणारे एक नेतृत्व आज आपण गमावले आहे औद्योगिक क्षेत्रात सुरुवातीपासूनच मुंबई आणि जिल्हास्तरीय झालेल्या बैठकांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असायचा

बँकांच्या प्रश्नांवर ते सातत्याने जागृती अग्रणी असायचे बँकिंग क्षेत्रात विश्वास संपादन करून बँकेचे विस्तारीकरण मोठ्याप्रमाणात करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे स्वतः इंजिनिअर ज्ञान असणारे छत्रपती शाहू अर्बन बँकेचे अध्यक्ष अर्जुन राव जाहीर पाटील औद्योगिक आणि बँकिंग क्षेत्रात विश्वसनीय आणि मार्गदर्शक म्हणून मानले जायचे त्यांच्या निधनामुळे मोठी पोकळी निर्माण झाली आहे माझ्या राजकीय वाटचालीत नेहमीच त्यांचे सहकार्य लाभले आहे

चांगल्या मार्गदर्शकाला मुकलो-नगराध्यक्ष डॉ भारत भूषण क्षीरसागर

बीड-शहरातील विविध प्रश्नाबरोबरच नवीन तरुण उद्योजकांना काम मिळावे औद्योगिक क्षेत्रात बीडचा विकास व्हावा अशी सातत्याने तळमळ असणारे स्व अर्जुनराव जाहेर पाटील यांच्या निधनाने एका चांगल्या मार्गदर्शकाला आपण मुकलो असल्याची प्रतिक्रिया बीडचे नगराध्यक्ष डॉ भारत भूषण क्षीरसागर यांनी दिली आहे

आज अर्जुनराव जाहेर पाटील यांचे निधन झाल्याची बातमी ऐकून खूप वाईट वाटले माझ्या राजकीय वाटचालीत त्यांचे खूप मोलाचे मार्गदर्शन मला लाभले बीडच्या विकासाच्या अनेक प्रश्नाबाबत त्यांनी मोलाच्या सूचना केल्या आहेत तरुणांना उद्योग क्षेत्रात संधी मिळावी यासाठी त्यांचा प्रयत्न असायचा स्वतः इंजिनिअरिंग झालेले अर्जुनराव विविध क्षेत्रात प्रचंड उत्सुक असायचे शिक्षण बँकिंग क्षेत्रात देखील त्यांनी विश्वास संपादन केला आहे आज त्यांच्या निधनाने एका चांगल्या मार्गदर्शकाला आपण मुकलो असल्याची प्रतिक्रिया नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर यांनी व्यक्त केली आहे