बीड

शहरी भागात प्रभाग सुरक्षा समिती स्थापन करा-अजित कुंभार

प्रभाग कोरोनामुक्त ठेवण्याकरीता समिती करणार कार्यवाही

ग्रामीण भागातील ग्राम सुरक्षा पथकांच्या धर्तीवर शहरी भागांमध्ये अंमलबजावणी

बीड/प्रतिनिधी

कोविड १९ या साथ रोगाचा प्रादुर्भाव टाळणे व त्याचा प्रसार रोखणे आवश्यक असल्याने बीड जिल्ह्यातील शहरी भागा मध्ये प्रभाग सुरक्षा समिती स्थापन करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी केले आहे.

पुणे, मुंबई, औरंगाबाद तसेच राज्यातील इतर जिल्ह्यांमधून शहर इतर राज्यातून मजूर, विद्यार्थी, प्रवासी व इतर नागरिक मोठ्या प्रमाणात परत येत असून या सर्व नागरिकांना २८ दिवसांकरीता क्वारंटाईन करणे आवश्यक असून याची प्रभावी अंमलबावणी करण्यासाठी ग्रामीण भागातील ग्राम सुरक्षा पथकांच्या धर्तीवर शहरी भागांमध्ये संबंधित मुख्याधिकारी यांनीदेखील प्रभागनिहाय प्रभाग सुरक्षा समितीची स्थापना करावी.

या समिती मध्ये प्रभागातील सुजाण, जागृत व सक्रिय नागरिकांचा प्राधान्याने समावेश करावा.

कोरोना प्रतिबंधासाठी प्रभाग सुरक्षा समितीचे कार्य आणि कर्तव्य

शहरी भागात आलेल्या व्यक्तीचे होम क्वारंटाईन करण्याची जबाबदारी ही पथक व प्रभाग सुरक्षा समिती याची संयुक्तरित्या राहिल.प्रभाग सुरक्षा समितीने वैदकिय पथकाच्या सहाय्याने गृहविलगीकरण केलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या घरावर स्टिकर चिकटवून, मोबाईल मध्ये आरोग्य सेतू व महाकवच अॅप डाऊनलोड केले जाईल याची खात्री करावीक्वारंटाईन कालावधीत संबंधित घरातील कोणत्या ही व्यक्तीला घरा बाहेर पडू देऊ नये. तसेच शहरातील कोणतीही व्यक्ती नातेवाईक यानी घरात प्रवेश करून नये. याची खबदारी घ्यावी.प्रभाग सुरक्षा सदस्यांनी या क्वारंटाईन कुटुंबांना या. कालावधीत अत्यावशक सेवा दूध,भाजीपाला, औषधी, किराणा इत्यादी घर पोहाच मिळेल याची खात्री करावीक्वारंटाईन व्यक्ती कटुंबातील इतर सदस्य यांनी कोणत्याही परिस्थितीत सार्वजनिक ठिकाणी वावरू नये याबाबत २४ तास जागृत राहून योग्य ती खबरदरी घ्यवीबाहेरून आलेल्या कोणत्याही व्यक्तीस ताप,सर्दी,खोकला, श्र्वसनाचा त्रास इत्यादी लक्षणे आढळून आल्यास संबंधित वैद्यकीय अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, वैदकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय व रुग्णालय यांच्याशी संपर्क साधावा.प्रत्येक प्रभाग समिती सोबत नगर पालिकेचे अधिकारी , वार्ड अधिकारी याची समन्वय अधिकारी म्हणून नेमणूक करावी. समन्वय अधिकारी यांनी प्रभाग समिती कार्यांन्वित ठेऊन आपला प्रभाग कोरोना मुक्त ठेवण्या करीता वेळो वेळी योग्य ती कार्यवाही करावी.प्रभाग सुरक्षा समितीची यादी जिल्हाधिकारी कार्यालय , जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय आणि संबंधित पोलिस स्टेशन येथे माहितीसाठी पाठवावी ,समन्वय अधिकारी यांनी प्रभाग समिती मार्फत कार्यवाही होत असल्याचे खात्री करून आपल्या प्रभात आलेल्या नागरिकांची यादी नुसार कार्यवाही करून हा अहवाल तालुका। आरोग्याधिकारी यांना सादर करावा.तसेच सदर माहिती तालुका आरोग्य अधिकारी यांनी गुगल शीट मध्ये भरावी. प्रभाग समिती यांची नेमणूक करताना राजकीय द्वेष, वाद होणार नाही याची काळजी घ्यावी .तसेच सर्वसामान्य न्याय वागणूक मिळेल याची खात्री करावी.

प्रभाग सुरक्षा समितीच्या प्रभावी अंमलबजावणी मुळे सर्वांनी सतर्क राहून या कोविड १९ या साथ रोगाला आपल्या शहरापासून व जिल्ह्यापासून दूर ठेवू असेे कळविले आहे.

कोरोना विषाणूचा प्रादर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 दिनांक 13 मार्च 2020 पासून लागू करून खंड 2, 3 व 4 मधील तरतदीनसार अधिसचना निर्गमित केलेली आहे आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 25 अन्वये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना करण्यात आलेली आहे व त्यातील पोट कलम 2 ( अ ) नुसार जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण बीड यांनी साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 अन्वये निर्गमित करण्यात आलेली अधिसूचना व नियमावलीमधील तरतुदीनुसार प्राप्त झालेल्या अधिकारानुसार साथरोग कायद्याचे अमंबजावणी साठी आपत्ती व्यवस्थापन कायदा बीड जिल्ह्यात लागू केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *