केज तालुक्यातील सात गावात बफर झोन लागू
अनिश्चित काळासाठी संचारबंदी-जिल्हाधिकारी राहुल रेखावर
बीड/प्रतिनिधी
जिल्ह्याच्या शेजारी असलेल्या कळंब तालुक्यात कोरोना चे तीन रुग्ण आढळून आले असून शहराच्या परिसरात तीन किलोमीटर अंतरात बीड जिल्ह्यातील एकही गाव येत नसले तरी शेजारी असलेल्या सात गावांमध्ये जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी बफर झोन जाहीर केले असून या गावांमध्ये अनिश्चित काळासाठी संचारबंदी लागू केली आहेत
बीड जिल्ह्याच्या सीमेवर कळंब तालुक्यात तोरणा तीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यामुळे शेजारी असलेल्या बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात असलेल्या काही गावांमध्ये कोरोना चा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केज तालुक्यातील सोनेसांगवी मांगवडगाव माळेगाव लाखा भोपळा हादगाव सुरडी बोरगाव या सात ठिकाणी बफर झोन जाहीर केले आहे बीड जिल्ह्यात इतर ठिकाणी कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून केज तालुक्यातील सात गावे आजपासून सात किलोमीटर परिसरात अनिश्चित काळासाठी पूर्णवेळ बंद करण्यात येऊन संचारबंदी लागू केली आली आहे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी याबाबत आदेश जारी केले आहेत