यंदा मान्सूनचे आगमन जूनच्या पहिल्या आठवड्यात

यंदा भारतात मान्सूनचं आगमन थोडंसं उशीराने


नवी दिल्ली : देशभरातल्या शेतकऱ्यांसह आपण सारेच ज्याची वाट बघच असतो तो पावसाळा जवळ आलाय. नैऋत्य मोसमी पाऊस म्हणजेच मान्सून एक जूनला केरळमधून भारतात प्रवेश करतो. हवामान खात्याच्या अंदाजानुसार मान्सून केरळात धडकण्याची सरासरी तारीख एक जून आहे, त्यात चार दिवस कमी किंवा जास्त होत असतात. या वर्षीचा अंदाज हवामान खात्याने आज जाहीर केला आहे. यंदा भारतात मान्सूनचं आगमन थोडंसं उशीराने होण्याची शक्यता आहे.
केरळमध्ये 1 जूनला येणारा मान्सून यंदा 5 जूनपर्यंत(+ – 4 दिवस) येईल असा भारतीय हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे.
गेल्या वर्षी हवामान विभागाने 6 जूनला नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन होईल असा अंदाज दिला होता, प्रत्यक्षात 8 जून रोजी झालं होतं.
2018 साली हवामान खात्याचा अंदाज होता 29 मे प्रत्यक्षात 29 मे रोजीच मान्सून दाखल झाला होता.
2017 साली हवामान खात्यानं सांगितलं होतं 30 मे तर 30 तारखेलाच आला होता मान्सून आला होता.
2016 साली हवामान खात्याने सांगितलं होतं 6 जून प्रत्यक्षात 8 जून तर
2015 साली हवामान खात्याने 30 मे तारीख सांगितली होती प्रत्यक्षात 5 जून रोजी आला होता मान्सून.
मान्सून आगमनाच्या तारखेचा अंदाज सांगणं भारतीय हवामान विभागाने 2005 पासून सुरु केलं आहे.
2015 साल सोडलं तर अंदाज चुकला नसल्याचं हवामान विभागातील अधिकारी सांगतात. त्यामुळे यंदा मान्यून पाच दिवस उशिरा म्हणजे 5 जूनला केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!