बीड जिल्ह्यातील109 एस टी कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह
बीड – प्रतिनिधी: मुंबईच्या प्रवासी सेवेसाठी राज्यातून एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात येत आहे. मागील काही दिवसांपासून राज्यातील विविध आगारात कर्मचारी मुंबई येथे मुंबई बेस्ट सेवेत कार्यरत आहेत.1 नोव्हेंबर पासून बीड विभागातील साधारण 800 कर्मचारी आत्तापर्यंत मुंबई येथे आपले कर्तव्य बजावत आहेत.18 दिवसात या कर्मचाऱ्यांपैकी बीड जिल्ह्यातील 109 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह झाल्याने ही जिल्हावासीयांना चिंतेची बाब वाटू लागली आहे.
मुंबई बेस्ट वाहतुकी साठी वाहक- चालक मिळून राज्यातील विविध आगारांच्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.परळी, माजलगाव सह जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे.कोरोना संसर्गाची संभाव्य दुसरी लाट लक्षात घेता एसटीच्या कर्मचाऱ्यांना बाधा होऊ नये म्हणून व त्यांच्यापासून इतरांना संसर्ग होऊ नये या काळजीतून परत आपापल्या आगारात बोलण्याची गरज आहे.
बीड विभागातील काही कर्मचारी संभाव्य कोरोना लागण लक्षात घेऊन मुंबईत सेवा करण्यास तयार नसल्याचे समजते.याआधी सांगली जिल्ह्यातील 114 कर्मचाऱ्यांना बाधा झाल्याने तेथील पालकमंत्र्यांनी सांगली विभागातील बस परत माघारी घेण्याचा निर्णय घेतला होता.कर्मचाऱ्यांना लागण झाल्याने पुढे संसर्ग वाढू नये यासाठी प्रशासन काय निर्णय घेते याकडे लक्ष लागले आहे.