बीड तालुक्यात 6351 शेतकऱ्यांची नोंदणी कापूस खरेदी केंद्र मात्र दोनच
सर्वच खरेदी केंद्र तात्काळ चालू करा- दिनकर कदम गणपत डोईफोडे यांची मागणी
बीड/प्रतिनिधी
बीड तालुक्यात कापूस खरेदी केंद्रांना मंजुरी मिळाली असून नऊ कापूस खरेदी केंद्राला मान्यता असताना फक्त दोनच कापूस खरेदी केंद्र सुरू आहे बीड तालुक्यात 6351 शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून या दोन कापूस खरेदी केंद्रावर दररोज केवळ 40 वाहने घेतली जातात हीच पद्धत ठेवली तर शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करायला सहा महिने लागतील आत्तापर्यंत फक्त सहाशे शेतकऱ्यांचाच कापूस खरेदी करण्यात आला आहे उर्वरित सात खरेदी केंद्र तात्काळ चालू करावेत अशी मागणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिनकर कदम व उपसभापती गणपत डोईफोडे यांनी केली आहे
बीड तालुक्यात यंदा कापसाचे चांगले उत्पादन झाले आहे शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करण्यासाठी शासनाकडून अधिकृत नऊ खरेदी केंद्राला मान्यता मिळाली आहे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन कापूस खरेदी केंद्र तात्काळ चालू करावेत अशी मागणी केली होती त्यानुसार 9 केंद्राला मान्यता दिली गेली प्रत्यक्षात मात्र दोनच खरेदी केंद्र सुरू आहेत त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा कापूस पडून आहे या खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांचा कापूस घेतला जातो त्या खरेदी केंद्रावर अनागोंदी कारभार सुरू आहे शेतकऱ्यांच्या कापसाच्या मापात दहा टक्के कपात करून शेतकऱ्यांचे नुकसान केले जात आहे एका सेंटरवर फक्त वीस वाहने घेतली जातात त्यातही अनेक शेतकऱ्यांचा कापूस खरेदीसाठी रद्द केला जातो कुठलीही पूर्वसूचना न देता चालू असलेली मापे बंद करण्यात येतात ग्रेडच्या मनमानी कारभारामुळे आतापर्यंत अनेक शेतकऱ्यांचा कापूस पडून आहे तर काही शेतकऱ्यांना कापूस परत घेऊन जावे लागत आहे ग्रेडर कडून त्रास होत असतानाच जिनिंग चालक देखील कापूस खराब असल्याचे कारण सांगून कुंटल मागे सात ते आठ किलो माप कमी धरतात हा शेतकऱ्यांवर होणारा अन्याय असून 6351इतकी नोंदणी झालेली असताना खरेदी केंद्र सुरू झाल्यापासून फक्त 600 शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करण्यात आला आहे त्यामुळे उर्वरित शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करण्यासाठी सहा महिन्याचा कालावधी लागेल आणि शेतकऱ्यांचा कापूस पडून राहील शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी बीड तालुक्यात मंजूर झालेले सर्वात खरेदी केंद्र तात्काळ चालू करावेत अशी मागणी बाजार समितीचे सभापती दिनकर कदम व उपसभापती गणपत डोईफोडे यांनी केली आहे