ऑनलाईन शॉपिंग करताय? मग सावधगिरी बाळगाच !

सध्या करोना संकटकाळ सुरू आहे. त्यातच दिवाळी तोंडावर आली आहे. गर्दीच्या ठिकाणी जाऊन खरेदी करणे यंदा दुहेरी धोकादायक बनले आहे. त्यामुळे बहुतांश लोक ‘ऑनलाईन खरेदी’ ला जास्त पसंती देत आहेत. बाहेर जाण्याची दगदग, पेट्रोल -गाडीचा खर्च यामुळे कमी होत असला तरी अशा खरेदीतून फसवणूकही मोठ्या प्रमाणात होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच ऑनलाईन खरेदी करताना सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे.

घरी बसल्या-बसल्या आपण ऑनलाइन ऑर्डर करतो, पेमेंट देखील ऑनलाइन केले जातात आणि खरेदी केलेले प्रॉडक्ट देखील आपल्याला घरी बसल्या मिळून जातं. या फेस्टिव्हल सीझनमध्ये तर ई-कॉमर्स कंपन्या ग्राहकांना मोठ्या ऑफर देखील देत आहे.

कॅश बँक सारख्या ऑफर बऱ्याच उत्पादनांवर चालत आहे. पण ऑनलाइन शॉपिंगमध्ये अनेकदा फसवणूक आणि लबाडी होत असते. हे टाळण्यासाठी आपण निश्चितच सावधगिरी बाळगली पाहिजे. ही फसवणूक टाळण्यासाठी पुढील गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. \

  1. आपले उत्पादन जेव्हा घरी येते तेव्हा मोबाइलवरून त्याचे पॅकिंग उघडताना व्हिडिओ किंवा फोटो तयार करा जेणेकरून तक्रार करण्याची वेळ आलीच तर आपल्याकडे पुरावा असेल.
  2. आपण ऑर्डर केलेल्या वस्तूंच्या जागी दुसरी वस्तू देखील मिळाली तर कंपनीच्या ग्राहक सेवा किंवा पोलिस स्टेशनात याबद्दल त्वरित तक्रार करा.
  3. अनेक कंपन्या सीओडी अर्थात कॅश ऑन डिलिव्हरी अश्या ऑफर देतात. सोयीचं असल्यास अश्या प्रकारे पैसे देणे कधीही योग्य ठरेल.
  4. कोणत्याही ऑनलाइन पोर्टलवर खरेदी करण्यापूर्वी आपण इतर कोणत्याही लिंकवर क्लिक करत तर नाहीये याची काळजी घ्या कारण असे झाल्यास नको ते नोटिफिकेशन किंवा ईमेलने आपला इनबॉक्स भरत असतो.
  5. ऑनलाइन खरेदी करताना दर वेळी एकच कार्ड वापरा. अशाने अकाउंट चेक करताना गोंधळ होण्याची शक्यता कमी अस


error: Content is protected !!