उस्मानाबाद जिल्हात एकाच दिवसात तीन करोना पॉजिटीव्ह;नागरीकांनी काळजी घ्यावी-आ कैलास पाटील

उस्मानाबाद प्रतिनिधी

उस्मानाबाद जिल्हातील पाथर्डी गावात पतिपत्नी तर एका महसूल विभागातील व्यक्ती करोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी असे आवाहन आ कैलास पाटील यांनी केले आहे

ग्रीन झोन असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्याला ग्रहण लागले आहे प्रशासनाने चांगली खबरदारी घेऊन पण पाथर्डी गावातील पती पत्नी आणि एका महसूल विभागातील व्यक्ती करोना पॉजिटीव्ह आढळून आला आहे त्यामुळे आता जिल्ह्यातील जनतेने सतर्क राहावे कळंब तालुक्यातील सर्व जनतेला माझी विनंती आहे की अशा परिस्थितीत सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करावे,प्रशासनामार्फत देण्यात येणाऱ्या सुचनांचे पालन करावे.
घाबरून न जाता आपण सर्वांनी घरात राहुन आपली तसेच आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी. असे आवाहन आ कैलास पाटील यांनी केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!