बंजारा समाजाचे धर्मगुरू डॉ. रामराव महाराज यांचे निधन:देशभरात शोककळा

मुंबई : देशभरातील बंजारा बांधवांचे श्रद्धास्थान असलेल्या बंजारा समाजाचे धर्मगुरू संत रामराव महाराज यांचे काल (30 ऑक्टोबर) रात्री उशिरा दीर्घ आजाराने निधन झाले. मुंबईतील लिलावती रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 89 वर्षांचे होते. संत रामराव महाराज हे वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी संस्थानचे प्रमुख होते.

वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथील बंजारा समाजाचे धर्मगुरू डॉ. रामराव महाराज यांना श्वास घेण्यास त्रास जाणवत होता. त्यामुळे त्यांना 17 ऑक्टोबरला उपचारासाठी मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र काल रात्री 11.30 च्या सुमारास त्यांचे निधन झाले. त्यामुळे देशभरातील बंजारा समाजावर शोककळा पसरली आहे.


error: Content is protected !!