किसान सन्मान योजनेचे खरे लाभार्थी कोण?बोगस लाभार्थ्यांवर कारवाईचा बडगा

केंद्र सरकारने मोठा गाजावाजा करीत प्रधानमंत्री किसान सन्मान योजना सुरु केली. मात्र बोगस लाभार्थ्यांनी ही योजना अशरक्षः पोखरुन काढली असून अल्पावधीतच ही प्रधानमंत्री किसान सन्मान योजना असन्मानीय लाभार्थींचे प्रतीक बनली आहे. लाखो अपात्र लाभार्थ्यांनी बनवेगिरी करीत या योजनेचा निधी आपल्या पदरी पाडून घेतला आहे. लवकरच या बोगस लाभार्थ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार असून त्यांनी लाटलेला निधी देखील परत मिळविण्यासाठी वसुली पथके नेमण्याची वेळ केंद्र सरकारवर आली आहे.

केंद्र सरकारने छोटय़ा शेतकऱयांना मदतीचा हात पुढे करताना प्रधानमंत्री किसान सन्मान योजना सुरु केली होती. ज्यात शेतकऱयांना वर्षाला 6 हजार रुपयांचा निधी दिला जाणार होता.
टप्याटप्पायने हा निधी शेतकऱयांच्या खात्यावर जमा करण्यात येणार होता. ही योजना जाहीर करताना केंद्र सरकारने लाभार्थींसाठी अटी आणि शर्थींची घोषणा देखील केली होती. त्यानंतरही अनेक बोगस लाभार्थ्यांनी या योजनेत नोंदणी पूर्ण करुन निधी कोटय़ावधींचा निधी लाटला असल्याचे समोर आले आहे. या लाभार्थ्यांची पडताळणी सुरु केल्यास लाखो बोगस लाभार्थ्याचे पितळे उघडे पडले आहे. त्यांची पडताळणीसाठी मोठी यंत्रणा राबविण्यात येत आहे. ज्या बोगस लाभार्थ्यांनी पैसे लाटले आहेत, त्यांच्याकडून हा निधी वसुल केला जाणार आहे. यासाठी आता एका विशेष स्वतंत्र खाते उघडण्यात येणार असून सरकारला परत द्यावयाचा निधी या खात्यात वर्ग करण्याची सूचना करण्यात आली आहे.

या योजनेत बोगस लाभार्थ्यांनी कोटय़ावधी रुपयांचा निधी आपल्या खात्यात वर्ग केला आहे. तो परत मिळविण्यासाठी एक स्वतंत्र यंत्रणा राबविण्यात येणार आहे. यासाठी पथके गावोगावी जाऊन अशा अपात्र लाभार्थ्यांच्या नावाची घोषणा ध्वनीक्षेपकावर जाहीर केली जाणार आहे. ही नावे जाहीर करताना त्यांनी किती निधी परत करावयाचा आहे, याची देखील घोषणा केली जाणार आहे.

काय होते निकष

जर शेतजमीन ही शेती करण्यायोग्य आहे. पण संबंधित शेतकरी त्याचा उपयोग दुसऱया गोष्टींसाठी करत असेल तर लाभार्थी योजनेस पात्र ठरणार नाही

शेतकऱयांच्या कुटुंबातील कोणी सदस्य नोकरी करत असेल तर योजनेसाठी अपात्र ठरणार आहेत.
z शेतकरी करदाता असेल तर तोही यासाठी अपात्र ठरणार आहे.


error: Content is protected !!