बीड जिल्ह्यात 128 रुग्णांना डिस्चार्ज तर 82 पॉझिटिव्ह रुग्णांची भर

आज प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 2095 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 82 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 2013 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

आज आलेल्या अहवालात

अंबाजोगाई 6, आष्टी 11

बीड 24, धारूर 2, गेवराई 8,

केज 3, माजलगाव 6,

परळी 5 , पाटोदा 7

शिरूर 8, वडवणी 3

रूग्ण सापडले आहेत.

बीड जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 12643 जणांना बाधा झाली आहे. त्यातील 10907 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर 1329 जणांवर उपचार सुरू आहेत. सोमवारी 128 जणांना सुट्टी देण्यात आली आहे. बीड जिल्ह्यात आतापर्यंत 407 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.


error: Content is protected !!