खुशखबर:देशातील 30 लाख सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस
नवी दिल्ली – देशातील 30 लाख सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस देण्याची घोषणा करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या
बैठकीत हा मोठा निर्णय घेण्यात आला. कॅबिनेटने घेतलेल्या या निर्णयाची माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे.
प्रकाश जावडेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे पैसे डीबीटीमार्फत (डायरेक्ट बेनिफिट ट्रानस्फर) थेट कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये पाठवले जाणार आहेत. दसऱ्याआधीच 30 लाख कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये केंद्र सरकारकडून एकूण 3737 कोटी रूपये पाठवले जाणार आहेत. लगेचच या निर्णयाबाबत अंमलबजावणी होणार आहे
माहितीनुसार या बोनसचा फायदा 17 लाख नाॅन गॅझेटेड कर्मचाऱ्यांना होणार आहे. यामध्ये रेल्वे, पोस्ट ऑफिस, ईपीएफओ, ईएसआयसीचे कर्मचारी यांचाही समावेश आहे. मिळणाऱ्या रकमेपैकी 2791 कोटी रूपये या कर्मचाऱ्यांना बोनस स्वरूपात मिळणार असून उर्वरित 13 लाख कर्मचाऱ्यांना नाॅन प्रोडक्टिव्हिटी लिंक्ड बोनसच्या स्वरूपात 946 कोटी रूपये मिळणार आहे.