अखेर भाजपला दणका बसलाच:नाथाभाऊ खडसे अखेर राष्ट्रवादीत जाणारच

मुंबई-नाही नाही म्हणता म्हणता अखेर भाजपला जोरदार दणका बसलाच,पक्षातील अंतर्गत वादाची अखेर करत जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपला राम राम ठोकत राष्ट्रवादी मध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला त्यामुळे आता त्यांच्या समर्थक असणाऱ्या सगळ्या आमदार व इतर नेत्यांचाही काही दिवसात प्रवेश होणारच हे आता नक्की झाले,नाथाभाऊ जाणारच नाहीत,त्यांची मनधरणी सुरू आहे,ते आमचे नेते आहेत असे म्हणून भाजपने त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी आज अखेर या चर्चेला पूर्ण विराम देत शिक्कामोर्तब केले आहे

भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे आता निश्चित झाले आहे. पण त्यांच्याबरोबर भाजपाचे अनेक आमदार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत जाहीर करत आश्चर्याचा धक्का दिला आहे.

पाटील म्हणाले, “खासगीत बऱ्याच जणांनी खडसेंबरोबर राष्ट्रवादीत यायची इच्छा व्यक्त केली आहे. जे खडसेंचे नेतृत्व मानतात ज्यांना राष्ट्रवादीत येण्यात काही अडचण नाही असे लोक राष्ट्रवादीत दाखल होतील. तसेच करोनाकाळात विधानसभेची निवडणूक घेणं परवडणार नाही त्यामुळे १० ते १२ आमदारांची घटनात्मक अडचण निर्माण होऊ नये म्हणून हे आमदार यथावकास राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.”


error: Content is protected !!