केजमध्ये स्वामी समर्थ संस्थानच्या देशपांडे घराण्याने वाटसरूसाठी सुरू केले अन्नछत्र
भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे;स्वामी समर्थ संस्थानचा उपक्रम
केज/प्रतिनिधी
भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा श्री स्वामी समर्थांचा मूळ मंत्र आहे,केज येथील श्री स्वामी समर्थ संस्थानच्या वतीने देशपांडे घराण्याने दि 11 मे पासून वाटसरूसाठी समर्थ धाब्यावर अन्नछत्र सुरू केले आहे येथे लॉक डाऊन मध्ये अडकलेल्या व स्वगृही जाणाऱ्या वाटसरू साठी मोफत जेवणाची सोय झाल्याने अनेकांना आधार मिळत आहे
लॉक डाऊन जाहीर झाल्यानंतर च्या आसपास रस्त्याचे काम करत असलेल्या झारखंड येथील मजुरांना खाण्याची चिंता वाढली होती तसेच गेल्या काही दिवसापासून परराज्यातून आणि परत जिल्ह्यातून येणाऱ्या वाटसरू ची संख्याही ही वाढू लागली आहे याच काळात केज येथील काही कै महारुद्र देशपांडे यांचे वंशज असलेल्या देशपांडे घराण्याने स्वखर्चातून समर्थ धाबा येथे अन्नछत्र सुरू केले आहे दिनांक 11 मे पासून ते 17 मे पर्यंत हे अन्नछत्र सुरू राहणार आहे देशपांडे घराण्यातील आनंतर रामराव देशपांडे (देसाईराव) रवींद्र देशपांडे (छोटूराव) शरद राव देशपांडे दिलीप राव देशपांडे गिरीश राव देशपांडे भाऊसाहेब देशपांडे मुरलीधर देशपांडे बाबासाहेब देशपांडे संजय देशपांडे प्रशांत देशपांडे प्रवीण देशपांडे समीर देशपांडे सचिन देशपांडे सुनील देशपांडे यांनी पुढाकार घेऊन हे अन्नछत्र प्रशांत देशपांडे यांच्या समर्थ धाब्यावर सुरू केले आहे दररोज या भागातून जाणाऱ्या वाटसरूंना दवाखान्यात असणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांना आणि रोडवर काम करत असणाऱ्या मजुरांना सकाळी 11 ते 2 आणि संध्याकाळी सात ते नऊ या वेळेत जेवणाची व्यवस्था करण्यात आली समोर असलेल्या भव्य मंडपामध्ये दररोज जवळपास दोनशे लोकांची जेवणाची व्यवस्था याठिकाणी करण्यात आली आहे देशपांडे घराण्याने घेतलेल्या या पुढाकारामुळे अनेकांची जेवणाची चिंता मिटली आहे