राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (NEET) यूजी 2020 चा निकाल अखेर जाहीर
राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (NEET) यूजी 2020 चा निकाल अखेर जाहीर करण्यात आला आहे. ntaneet.nic.in या अधिकृत वेबसाईटवर निकाल जाहीर झाला आहे. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना आपला अॅप्लिकेशन नंबर, जन्मतारिख आणि सेक्युरिटी पिन आवश्यक आहे. नीट परीक्षेचा निकाल घोषित करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी राष्ट्रीय चाचणी एजन्सीला दिले होते. त्यानुसार आज या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यासंदर्भात केंद्रीय मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी 12 ऑक्टोबर रोजी ट्वीट करत देखील माहिती दिली होती.
NEET Result 2020: रिझल्ट असा चेक करा
नीट 2020 परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी हे करा
- सर्वात आधी अधिकृत वेबसाईट ntaneet.nic.in वर या
- यानंतर रिझल्ट असं लिहिलेल्या लिंकवर क्लिक करा
- त्यानंतर अॅप्लिकेशन नंबर, जन्मतारिख आणि सेक्युरिटी पिन टाकून सबमिट करा
- नंतर नीट 2020 रिझल्ट आपल्या स्क्रिनवर दिसेल.
ज्या विद्यार्थ्यांनी NEET UG-2020 परीक्षा दिली होती ते एनटीएच्या ऑफिशियल वेबसाईट nta.ac.in आणि ntaneet.nic.in वर निकाल चेक करु शकतात. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना आपला रोल नंबर आणि जन्मतारीख आवश्यक असणार आहे.
लॉकडाऊनमुळं लांबलेली नीट 2020 ची परीक्षा 13 सप्टेंबर रोजी पार पडली होती. कोरोनाची पार्श्वभूमी असल्याने शिक्षण विभागाकडून योग्य ती खबरदारी घेत ही परीक्षा घेतली होती. देशभरातील जवळपास 15 लाख विद्यार्थी ‘नीट’ मेडिकल प्रवेश परीक्षेला बसले होते. महाराष्ट्रातील 2,28,214 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती.