बीड

कंटेनमेंट क्षेत्राबाहेरील आठवडी बाजारास परवानगी;आता दुकाना सकाळी 9 ते रात्री 9 चालू ठेवता येणार

बीड- राज्यशासनाने आजच नवीन नियमावली जाहीर केली असुन उद्या दिनांक 15 ऑक्टोबर 2020 पासून कंटेनमेंट क्षेत्राबाहेर स्थानिक आठवडी बाजार (व जनावरांचे बाजार) सुरु करण्यास परवानगी देण्यात आली असून परवानगी असणाऱ्या सर्व व्यवसाय दुकानांना आता सकाळी 9 वाजेपासून रात्री 9 वाजेपर्यंत कामकाज करता येणार असल्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी निर्गमित केले आहेत

राज्य सरकारने जाहीर केलेल्या आदेशानुसार बीड जिल्ह्यात दिनांक 31 ऑक्टोबर रोजी रात्री बारा वाजेपर्यंत फौजदारी प्रक्रिया दंड सहित्याचे कलम 144 (1)(3) अन्वये मनाई/ जमावबंदी आदेश लागू करण्यात आलेले असून ते आदेश 31 ऑक्टोबर पर्यंत लागू राहणार आहेत महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार आजच नवीन नियमावली जाहीर करण्यात आली असून काही ठिकाणी सूट देण्यात आली आहे यामध्ये कंटेनमेंट क्षेत्राबाहेरील स्थानिक आठवडी बाजारांना परवानगी देण्यात आली असून सर्व व्यावसायिक दुकानदारांना आता सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत दुकान उघडे ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे
याचबरोबर दिनांक 15 ऑक्टोबर पासून सर्व शासकीय व खाजगी ग्रंथालय व अभ्यासिका covid-19 चे नियम व सामाजिक आंतर स्वच्छतेचे पालन करून उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे गार्डन पार्क व इतर सार्वजनिक ठिकाणे चालू करण्यास परवानगी देण्यात आले आहे
दिनांक 15 ऑक्टोबर पासून कंटेनमेंट क्षेत्राबाहेर केवळ व्यावसायिकांशी संबंधित प्रदर्शने चालू करता येतील
कंटेनमेंट झोन क्षेत्राबाहेरील शाळांमध्ये अध्यापक वर्ग व अध्यापक व्यतिरिक्त कर्मचारी यांची कोणत्याही वेळी 50 टक्के उपस्थिती ऑनलाईन व तत्सम कोणत्याही कामासाठी ठेवता येणार आहे
आठवडी बाजाराच्या ठिकाणी भाजीपाला विक्रेते व ग्राहकांनी मार्ग वापरणे बंधनकारक राहणार असून बाजाराच्या ठिकाणी दोन व्यक्ती व विक्रेत्यांमध्ये किमान सहा फुटाचे अंतर ठेवणे बंधनकारक राहील दुकानदार यांनी स्वतः याबाबत दक्षता घेऊन ग्राहकांना सामाजिक अंतराचे पालन करण्यास सांगावे आठवडी बाजाराच्या ठिकाणी सामाजिक अंतराचे पालन न केले गेल्यास संबंधित विक्रेता व ग्राहक यांच्याविरुद्ध कारवाई करून दंड आकारण्यात येईल त्यामुळे गर्दी कुठेही होता कामा नये सार्वजनिक ठिकाणी आठवडी बाजाराच्या ठिकाणी गुटखा तंबाखू पप्पान इत्यादी धुम्रपानास बंदी असून आठवडी बाजाराच्या ठिकाणी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था यांनी बाजार भरण्यापूर्वी सदरील जागा करून घ्यावी व विक्रेत्यांना बसण्यासाठी जागा उपलब्ध करून खुणा निश्चित कराव्यात तसेच ग्राहकांना रांगेत उभे राहण्यासाठी तयार करावेत प्रत्येक विक्रेता याने शासनाचे नियम पाळूनच आपला व्यवसाय करणे बंधनकारक राहील भाजीपाला विक्रीची वेळ सकाळी सात वाजेपासून रात्री नऊ वाजेपर्यंत असेल असे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी निर्गमित केले आहेत