बीड

बीड जिल्ह्यात 150 रुग्णांना डिस्चार्ज:आज 80 पॉझिटिव्ह रुग्ण

आज सोमवारी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 624 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 80 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 544 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

आज आलेल्या अहवालात

अंबाजोगाई 17 आष्टी 17

बीड 17, धारूर 7, गेवराई 3

केज 3, माजलगाव 3

पाटोदा 6 शिरूर 4, वडवणी 2

रूग्ण सापडले आहेत.

बीड जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 11629 जणांना बाधा झाली आहे. त्यातील 9714 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर 1549 जणांवर उपचार सुरू आहेत. सोमवारी 150 जणांना सुट्टी देण्यात आली आहे. बीड जिल्ह्यात आतापर्यंत 366 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.