राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (NEET)14 ऑक्टोबरला:निकाल 16 ऑक्टोबरला

पुणे – करोना संकटात काही विद्यार्थ्यांना ‘नीट’ची परीक्षा देता आली नाही. त्यांना ती देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी परवानगी दिली.

त्यांची परीक्षा दि. 14 ऑक्‍टोबर रोजी होणार आहे. त्यानंतर देशभरातील ‘नीट’ परीक्षेचा निकाल 16 ऑक्‍टोबर रोजी जाहीर करण्यात येणार आहे.

वैद्यकीय प्रवेशासाठी अनिवार्य ‘नीट’ परीक्षा देशभरात 13 सप्टेंबर रोजी 3,843 परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली. त्यावेळी देशभरातील जवळपास 90 टक्‍के विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती.

या परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर होण्याची शक्‍यता होती. त्यामुळे दिवसभरात निकाल कधीही जाहीर होईल, याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले

NEET Result 2020: रिझल्ट असा चेक करा

नीट 2020 परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी हे करा

  • सर्वात आधी अधिकृत वेबसाईट ntaneet.nic.in वर या
  • यानंतर रिझल्ट असं लिहिलेल्या लिंकवर क्लिक करा
  • त्यानंतर अॅप्लिकेशन नंबर, जन्मतारिख आणि सेक्युरिटी पिन टाकून सबमिट करा
  • नंतर नीट 2020 रिझल्ट आपल्या स्क्रिनवर दिसेल.
  • आपला रिझल्ट डाऊनलोड करा किंवा प्रिंट काढून घ्या.

नॅशनल टेस्टिंग एजेंसी (NTA)कडून घेण्यात आलेल्या राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा 2020 (NEET UG) 2020 चा निकाल आता 16 तारखेला जाहीर होणार हे स्पष्ट झालं आहे. ज्या विद्यार्थ्यांनी NEET UG-2020 परीक्षा दिली होती ते एनटीएच्या ऑफिशियल वेबसाईट nta.ac.in आणि ntaneet.nic.in वर निकाल चेक करु शकतात. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना आपला रोल नंबर आणि जन्मतारीख आवश्यक असणार आहे. निकालासोबतच एनटीए आज नीट- 2020 परीक्षेची फायनल अंन्सर की देखील जाहीर करेल, असं बोललं जात आहे.


error: Content is protected !!