बीड जिल्ह्यात आज 118 पॉझिटिव्ह रुग्णांची भर

आज प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 821 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 118 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 703 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

आज अंबाजोगाई 23, आष्टी 20, बीड 21, धारूर 2, गेवराई 5, केज 10, माजलगाव 7, परळी 7 , पाटोदा 6, शिरूर 21, वडवणी 6 रूग्ण सापडले आहेत.

बीड जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 11 हजार 433 जणांना बाधा झाली आहे. त्यातील 9175 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर 1801 जणांवर उपचार सुरू आहेत. शनिवारी 157 जणांना सुट्टी देण्यात आली आहे. बीड जिल्ह्यात आतापर्यंत 343 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. दरम्यान या आठवड्यामध्ये कोरोनाचा मृत्युदर वाढला आहे


error: Content is protected !!