व्हॉट्सॲप मध्येआले नवीन फिचर:आत्ताचअपडेट करा

सगळ्यात जास्त व्हॉट्सॲप वापरणाऱ्यांची संख्या भारतात जास्त आहे. त्यामुळे व्हॉट्सॲपची वाढती लोकप्रियता लक्षात घेऊन व्हॉट्सॲप आपल्या युजर्ससाठी नेहमी काहीना काही नवीन घेऊन येत असते. आता युजर्सना व्हॉट्सॲप मध्ये नवीन फिचर आणि इमोजी उपलब्ध होणार आहे. यासाठी युजर्सला व्हॉट्सॲप अपडेट करावे लागणार आहे.

या नवीन फीचर्समध्ये तुम्हाला विविध प्रकारच्या नवीन इमोजीदेखील मिळणार आहेत. Advance Search नावाचा नवीन पर्याय तुम्हाला व्हॉट्सॲप मध्ये मिळणार आहे. यामध्ये अपडेट केल्यानंतर तुम्ही या फीचर्सचा लाभ घेऊ शकणार आहे. या नवीन अपडेटमुळे तुम्हाला तुमच्या व्हॉट्सॲप वरील फाईल, फोटो आणि व्हिडीओ लवकर सापडण्यास मदत होणार आहे.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारतात हे नवीन फिचर केवळ WhatsApp Business अकाउंट असणाऱ्या युजर्सना मिळणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला हे नवीन फिचर मिळालं नाही तर थोडी वाट पाहावी लागणार आहे.

या फीचर्सचा वापर करण्यासाठी तुम्ही तुमचं व्हॉट्सॲप उघडल्यावर या नवीन फीचरवर जाऊन तुम्ही जो फोटो किंवा व्हिडीओ आहे त्याच नाव टाकलं असता सर्व प्रकारची माहिती मिळणार आहे. यामुळे तुम्हाला प्रत्येक फोटो चेक करण्याची गरज नाही. केवळ तुमच्या फाईलचं नाव टाकून तुम्ही माहिती शोधू शकता.


error: Content is protected !!