धक्कादायक:एकाच दिवसात कोरोनाचे 13 बळी आज 137 पॉझिटिव्ह आढळले
बीड जिल्ह्यात (दि.7 ) रोजी जिल्ह्यात 137 जणांना कोरोनाची लागण झाली असून आज एकूण 785 स्वॅब तपासण्यात आले. यात 648 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत धक्कादायक बाब म्हणजे दि 6 रोजी एकाच दिवसात बीड जिल्ह्यात कोरोनाचे 13 बळी गेले असल्याची नोंद झाली असून आतापर्यंत 311 जण दगावले आहेत एकूण बाधीत संख्या 11371 झाली आहे
आजच्या अहवालात अंबाजोगाई तालुक्यात 24, आष्टी 28, बीड 31, धारूर 6, गेवराई 8, केज 1 माजलगाव 9,परळी 2, पाटोदा 8,शिरूर 3 आणि वडवणी 17,असा रूग्णांचा समावेश आहे.