बीड जिल्ह्यात 197 बरे झाले तर आज 182 पॉझिटिव्ह रुग्णांची भर
बीड जिल्ह्यात (दि.1) रोजी जिल्ह्यात 182 जणांना कोरोनाची लागण झाली असून आज एकूण 1250 स्वॅब तपासण्यात आले. यात 1068 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत सध्या 2422 रुग्णांवर उपचार सुरू आहेत
आजच्या अहवालात अंबाजोगाई तालुक्यात 17, आष्टी 23, बीड 38, धारूर 21, गेवराई 12, केज 23, माजलगाव 22,परळी 9, पाटोदा 5,शिरूर 3 आणि वडवणी 9,असा रूग्णांचा समावेश आहे.
बीड जिल्ह्यात एकूण 10054 बाधीत रुग्ण संख्या असून 7342 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत तर 2422 रुग्णांवर उपचार सुरू आहेत
बीड जिल्ह्यात 73.03 टक्के बरे होण्याचे प्रमाण आहे तर आतापर्यंत 290 रुग्ण दगावले आहेत