देशनवी दिल्ली

कोरोनाचं संकट नेमके किती महिन्यासाठी राहणार:भारतीय तज्ज्ञांच भाकीत

नवी दिल्ली-भारतासह जगभरात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. अनेक बळी या आजाराने घेतले असून आर्थिक घडी विस्कटून लावली आहे. आज अनेक देश यावर लस शोधण्यासाठी कार्य करत आहेत.

परंतु सध्या लस नसल्याने, संपर्ग टाळणे, मास्क, सॅनिटायझर वापरणे, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणे आदी गोष्टी सर्वानी पाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे. सध्या लस कधी येणार किंवा ही महामारी कधी संपणार याविषयी अनेकांच्या मनांत अनेक प्रश्न आहेत.

या प्रश्नाचं उत्तर भारतीय तज्ज्ञांनी दिलं आहे. ते म्हणतात पुढच्या वर्षीच कोरोनाच्या परिस्थितीतून आपण बाहेर पडू. 2021 सालच्या मध्यापर्यंत कोरोनाचं संकट कमी होईल, आपण सामान्य परिस्थितीत येऊ,

अशी शक्यता एम्सच्या (AIIMS) कम्युनिटी मेडिसीन विभागाचे प्रमुख डॉ. संजय राय यांनी व्यक्त केली आहे.
एएनआयने याबाबत ट्विट केलं आहे. डॉ. संजय राय म्हणाले, “भारतात कोरोना लशीचं दुसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायल सुरू आहे.

जर सर्वकाही नियोजनानुसार झालं, तर जगात तयार होत असलेल्या कोरोना लशींपैकी कोणतीही कोरोना लस पुढील वर्षाच्या मध्यापर्यंत उपलब्ध होईल. पण लस आली किंवा नाही आली तरीदेखील पुढील वर्षाच्या मध्यापर्यंत सर्वकाही सामान्य होईल अशी शक्यता आहे.

पण जोपर्यंत कोरोनाविरोधात प्रभावी लस उपलब्ध होत नाही. तोपर्यंत मास्क वापरणं, हातांची स्वच्छता असे प्रतिबंधात्मक उपाय आपण करायला हवेत” दरम्यान, वाढते कोरोनाचे संक्रमण पाहता जगभरात लोक लस येण्याच्या प्रतीक्षेत आहेत.

तसे संशोधनही जगभर सुरु आहे. अद्याप रशियाने आपली लस लॉन्च केली आहे. तर भारतात तीन लशींचे उत्पादन प्रगतीपथावर आहे.

यात ‘सीरम इन्स्टिटयूट’, ‘झाइडसकॅडिला’ आणि ‘भारतबायोटेक’ या तीन कंपन्यांकडून कोरोनाची लस तयार करण्याचे काम सुरू आहे. यातील ‘सीरम इन्स्टिटयूट’ची लस लवकरच येऊ शकते असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.