बीड

बिंदुसरा ओव्हरफ्लो मोठ्या चादरीवरून वाहू लागले पाणी


बीड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या बिंदुसरा धरणाच्या पाण्याची पातळी शंभर टक्के भरली असून मोठ्या चादरीवरून पाणी वाहू लागले आहे त्यामुळे हे पाणी बीड शहरातून जात असल्याने दगडी पुलावरून पाणी वाहत आहे पाणी पाहण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करू लागले आहे नदी पात्रात असणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आला आहे


दोन दिवस सलग झालेल्या पावसामुळे बिंदुसरा धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे सुरुवातीला सांडव्यावरून पाणी वाहत होते आता मोठ्या चादरीवरून पाणी वाहू लागले आहे धरण पाहण्यासाठी अनेकजण गर्दी करत असल्याचे चित्र दिसत आहे बिंदुसरा भरल्याने परिसरातील शेतीच्या पाण्याचा तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे या बरोबरच बीड शहराला पाणी पुरवठा करणारे माजलगाव धरणात देखील पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे