बीड

आज 93 जण कोरोनामुक्त तर आज 158 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ

बीड जिल्ह्यात आजच्या अहवालात 158 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून गेल्या काही दिवसांपासून ग्रामीण भागात अधिक रुग्ण आढळत आहेत आजच 93 जण बरे होऊन घरी परतले आहेत

जिल्ह्यात आतापर्यंत 5414 जण कोरोनाबाधित झाले आहेत. त्यात 3952 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या बीड जिल्ह्यात 1304 रूग्ण उपचार घेत आहेत.आज शनिवारी रोजी 93 रूग्णांना सुट्टी दिली आहे.
बीड जिल्ह्यात आतापर्यंत 158 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. मृत्युचा दर 2.83 एवढा आहे. तर रिकव्हरी रेट 73.98 एवढा आहे.
आतापर्यंत 67843 जणांची तपासणी करण्यात आली त्यात 62429 जणांचे अहवाल निगेटिव्ह निघाले आहेत