बीड जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढू लागली:आज 110 पॉझिटिव्ह
जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोनाने आपले वाढते मीटर सुरू केले आहे एकीकडे रुग्ण बरे होत असताना दुसरीकडे पुन्हा बाधीत रुग्णांची भर पडत आहे आजच्या अहवालात 110 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून गेल्या काही दिवसांपासून ग्रामीण भागात अधिक रुग्ण आढळत आहेत
बीड जिल्ह्यात काल सापडलेल्या 176 रूग्णांमुळे एकुण रूग्णांचा आकडा पाच हजाराच्या पुढे गेला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 5106 जण कोरोनाबाधित झाले आहेत. त्यात 3777 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या बीड जिल्ह्यात 1188 रूग्ण उपचार घेत आहेत.आज शनिवारी रोजी 62 रूग्णांना सुट्टी दिली आहे.
बीड जिल्ह्यात आतापर्यंत 141 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. मृत्युचा दर 2.76 एवढा आहे. तर रिकव्हरी रेट 73.97 एवढा आहे.