बीड

बीड जिल्ह्यात आज 117 कोरोना बाधीत आढळले

जिल्ह्यात मंगळवार (दि.1) आणखी 117 कोरोनाबाधीत रूग्ण वाढले असून आज अंबाजोगाई येथे सकाळी तपासणीसाठी पाठवलेल्या 656 अहवालांपैकी 117 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत तर 5 अहवाल अनिर्णयीत आहेत. उर्वरित 534 व्यक्तींचे स्वॅब रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. रविवारी बाधीत निष्पन्न झालेल्या रूग्णांमध्ये अंबाजोगाई तालुक्यात 12 आष्टी 14, बीड 32, धारूर 1, गेवराई 2, केजमध्ये 14, माजलगाव 18, परळीत 15, शिरूरमध्ये 5 तर वडवणी 2 रूग्णाचा समावेश आहे.

बीड जिल्ह्यात आता आजपर्यंतच्या एकूण कोरोनाबाधीत रूग्णांची संख्या 4588 झाली आहे. यापैकी 3356 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर 128 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.सध्या 1104 रुग्णांना उपचार सुरू आहेत