बीड

आजही चांगली बातमी:264 करोनामुक्त रुग्ण घरी जाणार

आज पुन्हा एकूण 264 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात येत आहे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जिल्ह्यात अधिक आहे त्यामुळे कोरोनाची जी भीती निर्माण झाली होती ती काही अंशी आता कमी होऊ लागली आहे

आज शुक्रवारी जिल्ह्यातील 264 रुग्ण कोरोना मुक्त होत असून त्यांना डिस्चार्ज देण्यात येणार आहे त्यामुळे कोरोनामुक्तीचा आकडा 2756 झाला आहे. या सर्वांना रुग्णालयातून सुटी देऊन घरी पाठविण्यात आले.आज 264 रुग्णांना सुटी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. आहेत.जिल्ह्यातील बाधीत संख्या 4267 असून 1396 रुग्णांवर उपचार सुरू आहेत सर्वाधिक रुग्ण बीडमध्ये बरे झाल्याची नोंद आहे
उपचार घेत असलेल्या पेक्षा बरे झालेल्यांची संख्या झाली दुप्पट आज परळीचे 105 रुग्ण घरी परतणार आहेत