बीड जिल्ह्यात आज 98 जणांची कोरोनावर मात तर 51 पॉझिटिव्हची भर
आज दि 26 ऑगस्ट रोजी प्राप्त झालेल्या अहवालात जिल्ह्यात 51 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत तर आजच 98 जणांना रुग्णालयातुन डिस्चार्ज देण्यात आला आहे
बीड जिल्ह्याचा कोरोना बाधित रुग्णांचा आकडा 4115 झाला असून आतापर्यंत 2289 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत तर 108 रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आलेली आहे
सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 1718 असून यामध्ये 1422 रुग्ण हे लक्षणें नसलेली असून सौम्य लक्षण असलेली 251 रुग्ण आहेत तर मध्यम लक्षणे असलेली 23 आहेत तर गंभीर लक्षणाची रुग्ण संख्या 22 रुग्ण आहेत
आज प्राप्त झालेल्या अहवालामध्ये जिल्ह्यात 51 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत
आत्तापर्यंत 59271 जणांची तपासणी करण्यात आली त्यात 55156 जनांचे अहवाल निगेटिव्ह आहेत.
जिल्ह्याचा रिकव्हरी रेट 55.62 इतका असून एकूण संख्येच्या 7.3 टक्के पॉझिटिव्ह रेट आहे,सर्वाधिक रुग्ण हे लक्षणे नसलेली असून त्यामुळे बरे होण्याचे प्रमाणही समाधानकारक आहे