आज पुन्हा 26 पॉझिटिव्ह:बीडला 16,कोरोना पाठ सोडेना

बीड जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढतच चालली आहे,कालच्या रिपोर्ट मध्ये तब्बल 24 पॉझिटिव्ह आढळून आले होते आजही-26 पॉझिटिव्ह आढळले आहेत,बीड जिल्ह्यात कोरोनाचा आकडा 354 पार होत आहे

बाधित रुग्णांचा आकडा 354 च्या वर जाऊन पोहोचली आहे त्यापैकी 174 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत तर जिल्ह्यात आत्तापर्यंत 17 जणांचा मृत्यू झालेला आहे सध्या उपचार घेत असलेले रुग्ण 142 आहेत
ज्या ठिकाणी पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहे तो भाग कंटेनमेंट झोन घोषित करून सील करण्यात येत आहे नागरिकांनी आता याचे गांभिर्य लक्षात घ्यायला हवे कोरोनाचे संक्रमण आता मोठ्या प्रमाणात होऊ लागले आहे रुग्णाच्या संपर्कात आलेल्या लोकांनाच आता कोरोनाची लागण होत असल्याचे स्पष्ट होऊ लागले आहे आज पाठवण्यात आलेल्या अहवालामध्ये देखील 26-पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत,

आजच्या अहवालात बीड 16,परळी 5,गेवराई 3 ,अंबाजोगाई 1,तर आष्टी 1 असे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!