बीड

आ नमिता मुंदडा यांच्या प्रयत्नाला यश :जिल्ह्यातील सर्व शिक्षकांना सणापूर्वीच वेतन अदा होणार

बीड- जिल्हा परिषद बीड अंतर्गत काम करणाऱ्या जिल्हा परिषद माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षकांचा पगार बारा महिने उशिरा होत असतो परंतु गणेशोत्सव आणि मोहरम या सणानिमित्त ऑगस्ट पेड इन सप्टेंबर वेतन विशेष बाब म्हणून 25 ऑगस्ट पूर्वी साधा करण्यात यावे अशी मागणी आमदार नमिता अक्षय मुंदडा यांनी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे केली होती त्यानुसार विशेष बाब म्हणून बीड जिल्ह्यातील शिक्षकांसाठी 51कोटी 80 लाख रुपयांच्या जवळपास नीधी मंजूर करून धनादेश जमा करण्यात आला असल्याची माहिती ज्येष्ठ नेते नंदकुमार मुंदडा यांनी दिली आहे गणेशोत्सव आणि मोहरम सणानिमित्त आता शिक्षकांना हे वेतन अदा केले जाणार असून यापुढे शिक्षकांना वेळेवर वेतन अदा करण्याचे आश्वासनही शिक्षण मंत्र्यांनी दिले असल्याचे त्यांनी सांगितले