बीड जिल्ह्यात आज 116 जणांची कोरोनावर मात तर 128 पॉझिटिव्हची भर
आज दि 23 ऑगस्ट रोजी प्राप्त झालेल्या अहवालात जिल्ह्यात 128 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत तर आजच 116 जणांना रुग्णालयातुन डिस्चार्ज देण्यात आला आहे
बीड जिल्ह्याचा कोरोना बाधित रुग्णांचा आकडा 3826 झाला असून आतापर्यंत 2054 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत तर 95 रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आलेली आहे
सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 2051 असून यामध्ये 1362 रुग्ण हे लक्षणें नसलेली असून सौम्य लक्षण असलेली 262 रुग्ण आहेत तर मध्यम लक्षणे असलेली 34 आहेत तर गंभीर लक्षणाची रुग्ण संख्या 22 रुग्ण आहेत
आज प्राप्त झालेल्या अहवालामध्ये जिल्ह्यात 128 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत
आत्तापर्यंत 50264 जणांची तपासणी करण्यात आली त्यात 46438 जनांचे अहवाल निगेटिव्ह आहेत.
जिल्ह्याचा रिकव्हरी रेट 53.60 इतका असून एकूण संख्येच्या 7.2 टक्के पॉझिटिव्ह रेट आहे,सर्वाधिक रुग्ण हे लक्षणे नसलेली असून त्यामुळे बरे होण्याचे प्रमाणही समाधानकारक आहे