देशनवी दिल्ली

एसबीआय ग्राहक ATM कार्ड न वापरता एटीएममधून पैसे काढू शकतात:पण कसे ?

नवी दिल्ली: स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) आपल्या ग्राहकांना कार्डलेस कॅश काढण्याची सुविधा प्रदान करत आहे. या सुविधेद्वारे ग्राहक डेबिट कार्डशिवाय बँकेच्या एटीएममधून सुरक्षित आणि सहज रोख रक्कम काढू शकतात. त्यासाठी तुमच्याकडे एसबीआयचे योनो अ‍ॅप (YONO) असणं गरजेच आहे. या अ‍ॅपद्वारे डेबिट कार्ड न वापरता एटीएममधून पैसे काढता येतात.

एसबीआय ग्राहक आपले डेबिट कार्ड न वापरता एटीएममधून पैसे कसे काढतात ते जाणून घ्या

एसबीआयचं इंटरनेट बँकिंग अ‍ॅप ‘योनो’ (YONO) डाउनलोड करा.

व्यवहार सुरू करण्यासाठी ‘योनो कॅश ऑप्शन्स’ वर जा.

नंतर एटीएम सेक्शन मध्ये जा आणि तुम्हाला जेवढी रक्कम काढायची आहे ती टाका.

एसबीआय आपल्या नोंदणीकृत मोबाइलवर तुम्हाला योनो रोख व्यवहार क्रमांक (कैश ट्रांजेक्शन नंबर) पाठवेल. हे चार तासांसाठी वैध असणार आहे.

एसबीआय एटीएम वर जा आणि एटीएम स्क्रीनवर ‘योनो कॅश’ (‘YONO Cash’) निवडा.

योनो (YONO) रोख व्यवहार क्रमांक प्रविष्ट करा.

योनो कॅश पिन प्रविष्ट करा आणि मान्य (accept) करा.

व्यवहाराची संपूर्ण माहिती व रोख रक्कम घ्या.

ही सुविधा दुसर्‍या बँकेच्या एटीएममधून पैसे काढण्यासाठी वापरली जाऊ शकते?

एसबीआय कार्डलेस कॅश काढण्याची सुविधा केवळ एसबीआय एटीएममध्ये वापरली जाऊ शकते. एटीएममध्ये डेबिट कार्डे आणि फसवणूक कमी करण्यासाठी ही सुविधा आहे.

रोख पैसे काढण्याची मर्यादा

एसबीआय ग्राहक व्यवहारात किमान ₹ 500 आणि जास्तीत जास्त 10,000 रोख पैसे काढू शकतात.

एटीएम व्यवहार अयशस्वी झाल्यास आपण काय करावे?

एटीएममध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्यामुळे पैसे काढता येत नसल्यास आणि ही रक्कम तुमच्या खात्यातून वजा केली तर घाबरून जाण्याची गरज नाही. फक्त आपल्या बँकेस त्वरित माहिती द्या