बीड

बीडमधील लोटस हॉस्पिटलमधून 16 जण कोरोनामुक्त

रुग्णालय प्रशासनाची उत्तम कामगिरी

बीड-जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरू झाल्यानंतर सरकारी दवाखान्यातून अनेक रुग्ण उपचारासाठी बाहेर जिल्ह्यात जाऊ लागले त्यातच वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता जिल्हाधिकारी राहुल रेखावार,आरोग्य अधिकारी डॉ बी आर पवार आणि जिल्हा शल्यचिकिस्तक डॉ अशोक थोरात यांनी सर्व बाबी तपासून लोटस रुग्णालयाला कोविड सेंटर म्हणून मान्यता दिली आतापर्यंत येथून 16 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत ही आनंदाची बाब आहे उपचार घेऊन बरे झालेल्या रुग्णांनी आज समाधान व्यक्त आहे,डॉ अमित काळे,डॉ आशीष गर्जे, डॉ श्रीनिवास शेळके यांच्या टीमने हे यश मिळवले आहे

बीड जिल्ह्यात कोरोना चा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर शहरात कोणत्याही रुग्णालयात उपचार करण्यास तयार नसताना फक्त लोटस रुग्णालयात खाजगी उपचार सुरू होते,याच काळात या रुग्णालयाला बदनाम करण्याचा प्रयत्नही झाला मात्र रुग्ण वाढीनंतर खाजगी रुग्णालये ताब्यात घेण्याचा जेव्हा निर्णय झाला तेव्हा लोटस च्या सर्व बाजू तपासून जिल्हाधिकारी राहुल रेखावार,सी एस डॉ अशोक थोरात यांनी या रुग्णालयाला कोविड सेंटर म्हणून मान्यता दिली,रुग्णालय संचालक डॉ अमित काळे,डॉ आशिष गर्जे,डॉ श्रीनिवास शेळके यांच्या उत्तम प्रशासनाची व कोविड बाबत सर्व नियमांचे पालन करून येथे रुग्णांना उपचारासाठी परवानगी देण्यात आली आतापर्यत 54 रुग्ण येथे दाखल झाले असून त्यात 16 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत,विशेष म्हणजे या रुग्णांमध्ये एक महिला 6 महिन्याची गर्भवती होती तिच्यावर देखील यशस्वी उपचार करण्यात आले यासर्व यशात रुग्णालयाचा स्टाफ मेहनत घेत आहे,याठिकाणी कुणाला काही अडचण आल्यास 9403580024,9881710786 यावर संपर्क साधावा असे आवाहन लोटस प्रशासनाने केले आहे