बीड

बीड जिल्ह्यात आज अ‍ॅन्टिजेन टेस्टमध्ये 154 पॉझिटिव्ह

बीड जिल्ह्यातील पाच शहरामधील व्यापा-यांच्या रॅपिड अ‍ॅन्टिजेन टेस्टची मोहिम सध्या राबवली जात आहे. आज काही कारणास्तव माजलगाव येथील व्यापा-यांची टेस्ट केली गेली नाही. मात्र चार शहरामध्ये झालेल्या रॅपिड अ‍ॅन्टिजेन टेस्टमध्ये 154 व्यापारी कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. आज तब्बल 4497 जणांची टेस्ट घेण्यात आली.
बीड जिल्ह्यात कोरोनाचे सामुहिक संक्रमण रोखण्यासाठी पाच शहरामध्ये व्यापा-यांच्या रॅपिड अ‍ॅन्टिजेन टेस्टची मोहिम राबवली जात आहे. पहिल्या दिवशी पाच शहरात 210 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. आज दुस-या दिवशी माजलगाव शहरातील काही कारणास्तव अ‍ॅन्टिजेन टेस्ट झाली नाही. मात्र उर्वरित परळी, केज, अंबाजोगाई आणि आष्टी या चार शहरामध्ये ही मोहिम राबवल्या गेली. एकुण 4497 जणांची अ‍ॅन्टिजेन चाचणी झाली. त्यात 154 जण कोरोना पॉजिटिव्ह आढळले आहेत. परळी शहरामद्ये पंचायत समिती, नटराज रंग मंदिर, बसस्थानक आणि सरस्वती विद्यालयाच्या बुथवर झालेल्या 1397 जणांच्या चाचणीमध्ये 64 जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. केजमध्ये 607 व्यापा-यांची आज तपासणी झाली त्यात 17 जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. अंबाजोगाईत 1890 जणांची टेस्ट करण्यात आली. त्यात 40 जण पॉझिटिव्ह आढळले आहेत तर आष्टीत 620 जणांच्या तपासणीत 33 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. बीड जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्हची संख्या 3126 इतकी झाली आहे.