देशनवी दिल्ली

Good News : भारतातील कोवॅक्सिनची चाचणी अंतिम टप्प्यात

नवी दिल्ली – करोनाचा कहर जगभर सुरु असताना काही आनंदाच्या बातम्या देखील समोर येत आहे. जगभरातील औषध कंपन्या करोना विरोधात लस शोधत आहेत. यातील काही कंपन्या यशाच्या जवळ आहेत. भारतातील ‘भारत बायोटेक’ या फार्मा कंपनीने पहिली स्वदेशी ‘कोवॅक्सिन’ ही लस तयार केली आहे. या लसीची ट्रायल अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.

भारताचे सिरम इन्स्टिट्यूट, झायड्स कैडिला आणि भारत बायोटेक करोना वॅक्सिनवर काम करत आहेत. यातील एक वॅक्सिन अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन आज तिसऱ्या टप्प्यामध्ये पोहचली आहे. या लसीची अंतिम टप्प्यातील चाचणीला बुधवारपासून सुरुवात करण्याची शक्यता आहे. हा टप्पा यशस्वी झाल्यास सामान्य नागरिकांना ती उपलब्ध होईल.

भारतात तीन करोना लस तयार केल्या जात असून यातील एकाच्या तिसर्‍या टप्प्यातील चाचणी बुधवारी सुरू होईल, अशी माहिती आरोग्य मंत्रालय आणि नीती आयोगानी संयुक्त पत्रकार परिषद घेत सांगितले होते.

दरम्यान, भारत बायोटेकची कोवॅक्‍सिन ही लस भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरोलोजी (एनआयव्ही) सोबत मिळून तयार करण्यात आली आहे. कोवॅक्‍सिनच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणी पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटला परवानगी देण्यात आली आहे. तर जगभरात करोना लससाठी क्लिनिकल चाचण्या सुरू आहेत, पण ऑक्सफोर्डची लस सर्वात पुढे मानली जाते.