किराणा सामानाची संपूर्णपणे घरपोच सेवा दिनांक १३ में २०२० पासून–जिल्हाधिकारी राहुल रेखावार
दिनांक १३ ते १७ में २०२० किराणा दुकाने बंद;निडली ऐप” मधून किराणा सामानाची संपूर्णपणे घरपोच सेवा
अतिशय कमी उत्पन्न असणाऱ्या वस्त्यांमधील किराणा दुकानांना सूट
इतर बाबींची दुकाने व आस्थापनांच्या वेळेत व दिनांकात कोणताही बदल नाही
बीड, दि. ९:- जिल्हयातील ११ शहरांमध्ये किराणा सामानाची संपूर्णपणे घरपोच सेवा ” निडली अॅप ” मधून सुरु करून या कालावधीत किराणा दुकाने बंद ठेवण्याच्या यापूर्वीच्या आदेशात बदल करण्यात आला असून पूर्वीच्या दिनांक १० मे २०२० रोजी या तारखेऐवजी दिनांक १३ ते १७ में २०२० असा आला आहे असा आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिला आहे .
यापूर्वीच्या आदेशात किराणा साहित्याची खरेदी " निडली अॅप " मधूनच करुन होम डिलेव्हरी स्वरुपात सुरु करून संपूर्णपणे घरपोच सेवा देण्याच्या व दिनांक 10 ते 17 मे 2020 या कालावधीत किराणा दुकाने बंद ठेवण्याचे निर्देश दिले होते . आजच्या आदेशात यात बदल करण्यात आला असून पूर्वीच्या दिनांक १० मे २०२० रोजी या तारखेऐवजी दिनांक १३ में २०२० रोजी पासून 17 मे 2020 या कालावधीत जिल्हयातील ११ शहरांमध्ये किराणा सामानाची संपूर्णपणे घरपोच सेवा सर्व किराणा दुकानदाराच्या सहाय्याने सुरु करण्यात येत आहे.
तसेच जिल्हयातील ११ शहरामध्ये अतिश्य कमी उत्पन्न असणाऱ्या वस्त्यांमधील किराणा दुकानदारांना सर्व ग्राहकांपर्यंत पोहचण्यासाठी दिनांक १७ मे २०२० पर्यंत विषम दिनांकास सकाळी ७.०० ते सकाळी ९.३० या कालावधीमध्ये खुले राहण्याची मुभा देण्यात येत आहे.
" निडली अॅप " मध्ये बीड जिल्हयातील ११ शहरातील इतर दुकानदारांनाही टप्या टप्याने काही दिवसातच याच पध्दतीने सामावून घेण्यात येईल, जेणे करुन इतर जिवनावश्यक नसणाया आणि ज्यावी घरपोच सेवा देणे क्लिष्ट आहे. अशी दुकाने सुध्दा उघडता येतील आणि गर्दीवर नियंत्रण राहील.सदरील तयारी ही आपल्या जिल्हयासमोर भविष्यांत उदभवू शकणाऱ्या कोरोनाच्या अति कठीण संकटाच्या काळात तोंड देण्यास उपयोगी ठरेल, महाराष्ट्र शासन यांचे आदेशाप्रमाणे सर्वच दुकानांना घरपोच सेवा देण्यास प्रोत्साहीत करण्यात येत आहे.
ग्रामीण भागातील विषम दिनांकास असणारी सकाळी ७.०० ते सकाळी ९.३० दरम्यानची संचारबंदीवी सुट दिनांक ११ में २०२० पासून सकाळी ७.०० ते दुपारी २.०० अशी करण्यात येत आहे, परंतू शहरी भागातील वेळेत कोणताही बदल करण्यात येत नाही.इतर सर्व प्रकारच्या दुकानांना यापूर्वी दिलेल्या आदेशानुसार जाहीर केलेले। वेळापत्रक लागू राहील.बँकाद्वारे वाटप करण्यात येणारे सर्व प्रकारचे अनुदान, पिक कर्ज इ. सर्व प्रकारच्या शेतकऱ्यांसाठी उपयुक्त सेवा दिनांक ११ मे २०२० पासून येणारा कृषी हंगाम पाहता सुरु करण्यास परवानगी असेल.* यासाठी बँकांनी गावनिहाय कार्यक्रम तात्काळ बनवून घोषित करावा. ज्यामुळे बैंकामध्ये होणारी गर्दी कमी होईल.यापूर्वी वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश, सुधारीत आदेश, सुधारणा आदेश या आदेशासह अमंलात राहतील.