रॅपिड अँटीजेन टेस्ट मध्ये 86 सह आज 203 पॉझिटिव्ह
आज दि 8 रोजी प्राप्त झालेल्या अहवालात 203 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत आजच बीड शहरात 6 ठिकाणी 2601 जणांची रॅपिड अँटीजेन टेस्ट घेण्यात आली त्यात 86 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत त्यामुळे जिल्ह्यात बाधीत रुग्ण संख्या आता वाढली आहे
बीड जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचे 1380 एकुण रूग्ण आढळुन आले असुन सध्या केवळ 714 रूग्णांवर जिल्ह्यात उपचार करण्यात येत आहेत. 1380 पैकी आजपर्यंत 621 रूग्ण कोरानामुक्त झाले असुन आज शनिवारी 36 रूग्णांना सुट्टी देण्यात आलेली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत 45 जणांचा कोरानामुळे मृत्यू झालेला आहे