बीड

बीड शहरात 10 ठिकाणी तर जिल्ह्यात 20 ठिकाणी संचारबंदी लागू

४ तालुक्यातील ६ गावांसह ५ शहरातील एकूण ३० ठिकाणी कंटेनमेंट झोन घोषित

बीड, दि, ८ (जिमाका)::- जिल्ह्यातील विविध ठिकाणी कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळून आल्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना जिल्ह्यातील ४ तालुक्यातील ६ गावांसह ५ शहरातील एकूण ३० ठिकाणी कंटेनमेंट झोन घोषित करुन अनिश्चित कालावधीसाठी फौजदारी प्रक्रिया दंड संहिता १९७३ चे कलम १४४ (१)(३)नुसार पूर्णवेळ संचारबंदी लागू केली आहे असे आदेश अप्पर जिल्हादंडाधिकारी प्रविणकुमार धरमकर यांनी दिले आहेत.
याबाबतचा अहवाल जिल्हा आरोग्य अधिकारी बीड यांनी दिला आहे. त्यामुळे जिल्ह्यात इतर ठिकाणी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक व्यवस्था कार्यरत करण्यात आली आहे .

केज तालुक्यातील कानडी माळी व बांगर वस्ती, बीड तालुक्यातील नागापूर खुर्द , माजलगाव तालुक्यातील चिंचगव्हाण आणि शिरूर कासार तालुक्‍यातील शिरापूर धुमाळ व टेंभुर्णी
तसेच
बीड शहरातील राजुरी वेस, शाहूनगर , पिंगळे गल्ली , जमजम कॉलनी, बशीर गंज, काळा हनुमानठाणा, मारुती मंदिर जवळ लोनापुरा, संत नामदेव नगर व चर्हाटा फाटा,


अंबाजोगाई शहरातील गांधी नगर, माळीनगर, प्रशांत नगर, गुरुवार पेठ मध्ये २ ठिकाणी, पाटील चौक व क्रांतीनगर,
केज शहरातील वकील वाडी मध्ये दोन ठिकाण व फुलेनगर ,
परळी शहरातील इस्लामपुरा बंगला , किर्ती नगर, तळ विभाग नेहरू चौक व रामनगर आणि धारूर शहरातील क्रांती चौक या ६ गावात व शहरांमधील वरील संबंधित २४ परिसरात कंटेनमेंट झोन ( Containment Zone) घोषित करण्यात आले आहे असे आदेशात नमूद केले आहे.

या सर्व संबंधित ठिकाणी अनिश्चित काळासाठी बंद करण्यात येवून पूर्णवेळ संचारबंदी लागू करण्यात आली आहेत.

राज्य शासनाने लोक डाऊन कालावधी ३१ ऑगस्ट २०२० पर्यंत वाढविला असल्याने त्याअनुषंगाने जिल्ह्यात दिनांक 31 ऑगस्ट २०२० रोजीच्या रात्री १२ पर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता कलम (१) (३) लागू करण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *