जिल्ह्याबाहेरुन बीड जिल्ह्यात येणाऱ्या व्यक्तींना सक्तीचे संस्थात्मक विलगीकरण– जिल्हाधिकारी राहुल रेखावार
बीड, दि. ३::–लॉकडाऊन कालावधीमध्ये बीड जिल्ह्यामध्ये प्रवेश करणाऱ्या नागरिकांकडून कोव्हीड-19 विषाणूचा प्रसार होऊ नये याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्याबाहेरुन बीड जिल्ह्यात येणाऱ्या व्यक्तींना सक्तीचे संस्थात्मक विलगीकरण (Institutional Quarantine) करण्यात येणार आहे.याबाबत निर्देश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहे.
बीड जिल्ह्यात वाढत्या संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी या अनुषंगाने संशयित कोविड बाधित रुग्णांना म्हणून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या अधिक जोखमीच्या संपर्कातील व्यक्ती (High risk contact) यांना संस्थात्मक विलगीकरण (Institutional Quarantine) करण्यात येत आहे. यासाठी ज्या जिल्ह्यामध्ये कोविड विषाणूचा खुप जास्त संसर्ग झालेला आहे अशा ठिकाणावरुन येणाऱ्या आणि कमी संसर्ग असलेल्या जिल्ह्यातून येणाऱ्या व्यक्तींना सुद्धा बंधनकारक संस्थात्मक विलगीकरण( Institutional Quarantine) करण्यात येईल.
यापुढे जिल्ह्याबाहेरुन येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला संस्थात्मक विलगीकरण ( Institutional Quarantine) करण्यासाठी अशा सर्व व्यक्तींची नियमाप्रमाणे तपासणी (RTPCR Test/ Antigen test) घेण्यात येईल.
या विलगीकरण केंद्रांसाठी २२ ठिकाणी इमारतींची निवड करण्यात आली असून प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी खुप जास्त संसर्ग असलेल्या जिल्ह्यातून बीड जिल्ह्यात येणाऱ्या व्यक्तींना ठेवण्यासाठी एक आणि कमी संसर्ग असलेल्या जिल्ह्यातून बीड जिल्ह्यात येणाऱ्या व्यक्तींना ठेवण्यासाठी एक असे दोन विलगीकरण केंद्र शाळा , वसतिगृहे आणि महाविद्यालयात उभारण्यात येत आहेत. असे जिल्ह्यात एकूण २२ विलगीकरण केंद्र तयार केले जात आहेत.
येथे संबंधित नगर पालिका,नगर पंचायत या केंद्रावरील सुरक्षा, पाणी वीज अशा सर्व सुविधा करण्यात येणार असून केंद्राचे अंतर्गत स्वच्छता व भोजन शासकीय रुग्णालयातील कर्मचारी यांच्या मार्फत कोवीड-19 विषयक सर्व सुरक्षेचे पालन करुनच करण्यात येईल
तालुका आरोग्य अधिकारी यांच्याकडून या विलगीकरण केंद्रातील सर्वांची रोज दिवसातून दोन वेळा वैेद्यकीय तपासणी होईल
जिल्ह्यात साथरोग प्रतिबंधक कायदा 1897 अन्वये निर्गमित करण्यात आलेली अधिसूचना व नियमावलीमधील तरतुदीनुसार कोव्हीड-19 विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजनेच्या अनुषंगाने दि.31 ऑगस्ट, 2020 रोजीपर्यंत बीड जिल्ह्यात फौजदारी प्रक्रिया संहिताचे कलम 144 (103) रात्री 12.00 वाजेपर्यंत लागू आहेत यासह हे आदेश लागू करण्यात आले आहेत.