देशनवी दिल्ली

सॅनिटायझर लावलेल्या हातांनी खाणे कितपत सुरक्षित आहे?

सध्या कोरोना विषाणूने जगभर थैमान घातले आहे. या विषाणूपासून वाचण्यासाठी डॉक्टरांनी काही सूचना दिल्या आहेत. त्यापैकी म्हणजे आपले हात स्वच्छ ठेवणे. त्यासाठी हात वारंवार धुणे. तसेच र चा वापर करणे. त्यामुळे सॅनिटायझरला अनन्यसाधारण महत्त्व आले आहे. अनेकवेळा आपल्याला हात धुणे शक्य होत नाही म्हणून सर्रास सॅनिटायझरचा वापर होतो. पण सॅनिटायझर लागलेया हातांनी खाणे कितपत सुरक्षित आहे?
आज तक या वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार सॅनिटायझर लागलेल्या हातांनी खाणे धोकादायक असू शकतं. कारण त्यात अल्कोहोल असतं. सॅनिटायझरने हात साफ केल्यानंतर किमान 20 सेकंदांनंतर खाणे योग्य ठरले. असे न केल्यास सॅनिटायझरमधील अल्कोहोलमुळे मूत्रपिंड, यकृत आणि हृदयावर त्याचा परिणाम होऊ शकतो. हाताला सॅनिटायझर लावल्यानंतर किमान 20 सेकंद थांबावे. त्यानंतर सॅनिटायझरची वाफ होऊन ते नष्ट होते.
सॅनिटाझरलाही काही मर्यादा आहेत. जेव्हा तुम्ही सॅनिटायझर लावता तेव्हा विषाणू नष्ट होतात. परंतु जेव्हा सॅनिटायझर लावल्यानंतर 20 सेकंदांनी कुठल्याही वस्तूला हात लावत तेव्हा पुन्हा विषाणू हातावर येण्याची शक्यता आहे. तसेच सातत्याने सॅनिटायझर लावणे चांगले नाही. त्यामुळे हातातील काही चांगले विषाणू मृत्यू पावतात. त्यासाठी फक्त साबणाने हात धुवावे असा सल्ला डॉक्टर देतात.

सॅनिटायझर वापरण्यासाठी काही सूचना

हात स्वच्छ असलेल्या हातांसाठीच सॅनिटायझर वापरावे, अन्यथा साबणाने हात स्वच्छ धुवाव्वे
ज्या सॅनिटायझरमध्ये 60-70 टक्क्के इथॉइल किंआ आइसोप्रोपाईल अल्कोहोल असेल तेच सॅनिटाझर वापरावे
हात स्वच्छ करताना WHO च्या सूचनांचे पालन करावे
किमान 15-20 सेकंद हात स्वच्छ करावे
सॅनिटायझर ऐवजी साबणाने हात धुण्यास प्राधान्य द्यावे
स्वच्छ पाण्याने हात धुतल्यानंतर सॅनिटायझरचा वापर करू नये
सॅनिटायझरचा योग्य प्रमाणात वापरा करावा
चेहर्‍यावर सॅनिटायझर लावू नये
जेव्हा हात धुण्यासाठी पाणी नसेल तरच सॅनिटायझरचा वापर करावा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *