देशनवी दिल्ली

खुशखबर:विनाअनुदानित घरगुती गॅस सिलेंडरच्या दरांमध्ये वाढ नाही

नवी दिल्ली – कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटाच्या काळात विनाअनुदानित गॅस सिलेंडरच्या दरांमध्ये केंद्र सरकारने या महिन्यासाठी सर्वंसामान्यांना दिलासा दिला आहे. गेल्या दोन महिन्यात झालेल्या वाढीनंतर ऑगस्ट महिन्यामध्येही एलपीजी सिलेंडरच्या दरात वाढ होईल, असा अंदाज वर्तवण्यात येत होता. मात्र घरगुती वापराच्या सिलेंडरच्या दरात कुठलीही वाढ करण्यात आलेली नाही. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे.

गेल्या महिन्यामध्ये सिलेंडरच्या दरात दिल्लीमध्ये एक रुपयाने तर मुंबईत साडेतीन रुपयांनी वाढ झाली होती. तर जून महिन्यात सिलेंडरचे दर ११.५० रुपयांनी वाढले होते.
आता ऑगस्ट महिन्यातील विनाअनुदानित गॅस सिलेंडरचे दर पुढीलप्रमाणे असतील. दिल्ली ५९४ रुपये, मुंबई ५९४ रुपये, कोलकाता ६२१ रुपये आणि चेन्नई ६१०.५० रुपये एवढे राहतील. दरम्यान, गेल्या महिन्यातही ग्राहकांना याच किमतीला विनाअनुदानित गॅस सिलेंडर खरेदी करावे लागले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *