बाधितांपेक्षा बरे होण्याचे प्रमाण वाढले:आज तब्बल 50 पॉझिटिव्ह
आज दि 31 रोजी तपासणीसाठी पाठवण्यात आलेल्या अहवालात जिल्ह्यात 50 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत हे सर्व बाधीत रुग्णांच्या संपर्कात असणारी आहेत
बीड जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या 731 झाली असून जिल्ह्यात एकूण उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या 290 आहे आज पर्यंत बीड जिल्ह्यासह इतर जिल्ह्यात मयत झालेल्यांची संख्या 29 नोंदवण्यात आली आहे विशेष बाब म्हणजे जिल्ह्यातील रुग्णालयात उपचार घेऊन घरी गेलेले रुग्ण 416 आहेत त्यामुळे बाधित रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे
बीडच्या रुग्णालयातून 151 बीडच्या कोविड सेंटर मधून 79 यासाठी अंबाजोगाई 21, कोविड सेंटर अंबाजोगाई 104, उपजिल्हा रुग्णालय गेवराई 10 ,ग्रामीण रुग्णालय माजलगाव 13, केज 3, परळी येथुन 2 तर इतर जिल्ह्यात उपचार घेत असलेले 31 रुग्ण असे 416 रुग्ण कोरोनामुक्त झालेले आहे
एकूण रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणें असलेल्या रुग्णांची संख्या 161 आहे तर 14 रुग्णांची लक्षणे गंभीर स्वरूपाची आहेत 21 रुग्णांची लक्षणे मध्यम तर 94 रुग्णांची लक्षणे हे सौम्य स्वरूपाचे आहेत