शेतकऱ्यांसाठी दिलासा:पीक विमा भरण्यासाठी मुदत वाढली

प्रधानमंत्री पीक विमा योजनेची मुदत 31 जुलै जाहीर करण्यात आली होती मात्र केंद्र सरकारच्या कृषी मंत्रालयाने ही मुदत आता 5 ऑगस्ट पर्यंत वाढवून दिली आहे शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील पीक विमा भरण्यासाठी शासनाने 31 जुलै ही तारीख शेवटची घोषित केली होती मात्र 15 जुलै रोजी अनेक शेतकऱ्यांकडून ही मुदत वाढून देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती त्यानुसार आता शेतकऱ्यांना 5 ऑगस्टपर्यंत पिक विमा भरण्यासाठी सवलत मिळाली आहे ज्या शेतकऱ्यांनी पिक विमा भरला नसेल त्या शेतकऱ्यांसाठी ही वाढलेली मुदत फायद्याची ठरणार आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!