बीड

आज पुन्हा दोन आकडी संख्या:जिल्ह्यात 37 पॉझिटिव्ह

आज गुरुवारी बीड जिल्ह्यातील 437 जनांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले होते,त्यात जिल्ह्यात 37 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत,बुधवारी 437 अहवालात तब्बल 58 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले

कोरोना आता बीड जिल्ह्यात चांगलेच पाय पसरू लागला आहे असे असले तरी दिलासादायक बाब म्हणजे ज्या प्रमाणात पॉझिटिव्ह रुग्ण संख्या आढळून येत आहे तेवढ्याच प्रमाणात बरे होण्याचे प्रमाणही तितकेच आहे कालच्या अहवालानुसार 313 रुग्ण बरे होऊन कोरोना मुक्त झाले आहेत तर 357 रुग्णांवर उपचार सुरू आहेत इतर आजार असणारे परंतु कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आलेले 27 रुग्ण मृत्युमुखी पडले आहेत सध्या बीड जिल्ह्यात 639 कोरोना बाधित रुग्णांची नोंद आहे
आज दि 30 रोजी प्राप्त झालेल्या अहवालानुसार बीड जिल्ह्यात 37 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *