दहावीचा निकाल जाहीर, राज्याचा निकाल 95.30%, यंदाही मुलींची बाजी

दहावी एसएससी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. राज्याचा निकाल 95.30 टक्के लागला असून पंधरा वर्षातील हा सर्वाधिक निकाल आहे. कोकण विभागाचा निकाल सर्वात जास्त म्हणजे 98.77 टक्के, तर औरंगाबाद विभागाचा निकाल सर्वात कमी म्हणजे 92 टक्के इतका लागला. पुणे विभागाचा निकाल 97.34 टक्के लागला, तर मुंबई विभागातून 96.72 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. सालाबादप्रमाणे यंदाही निकालात मुलींनी बाजी मारली. दहावीच्या परीक्षेत 96.91 टक्के मुली, तर 93.90 टक्के मुले उत्तीर्ण झाले आहेत. मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर दहावीचा निकाल पाहता येईल
कोकण – 98.77 टक्के
पुणे – 97.34 टक्के
कोल्हापूर – 97.64 टक्के
मुंबई – 96.72 टक्के
अमरावती – 95.14 टक्के
नागपूर – 93.84 टक्के
नाशिक – 93.73 टक्के
लातूर – 93.09 टक्के
औरंगाबाद – 92 टक्के

‘या’ वेबसाईटवर निकाल पाहता येणार

www.mahresult.nic.in
www.sscresult.mkcl.org
www.maharashtraeducation.com
www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालासोबतच वेगवेगळी सांख्यिकी माहिती देखील उपलब्ध असणार आहे.

निकाल कसा पाहाल ?
?निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी वर दिलेल्या कोणत्याही वेबसाईटवर जा.

?त्यानंतर तुम्हाला SSC BOARD RESULT नावाचा ऑप्शन दिसेल.

?त्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा सीट नंबर स्पेसशिवाय टाईप करावा लागेल.

?त्यानंतर खालच्या रकान्यात तुमच्या आईच्या नावाची पहिली तीन अक्षर टाकावी लागतील. म्हणजेच समजा तुमचा नंबर M123456 असा असेल आणि तुमच्या आईचे नाव रेश्मा असेल, तर तुमच्या पहिल्या रकान्यात M123456 हा सीट नंबर येईल आणि दुसऱ्या रकान्यात आईच्या नावाची पहिली तीन अक्षरे म्हणजेच RES असे लिहावे लागेल.

?यानंतर लगेचच तुम्हाला तुमचा निकाल स्क्रीनवर पाहाता येईल

?निकाल पाहिल्यानंतर तुम्हाला तो डाऊनलोडही करता येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना निकालाची प्रिंटआऊटही काढता येणार आहे.

एसएमएसवर निकाल

बीएसएनएल मोबाइलधारकांना एसएमएसवर निकाल पाहता येणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांना MHHSC असा एसएमएस टाईप करुन 57766 वर पाठवावा लागणार आहे. त्यानंतर अवघ्या काही सेकंदात विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल एसएमएस सेवेद्वारे पाठवला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!