बीड जिल्ह्यातआजही 37 पॉझिटिव्ह:बीडमध्ये 21 रुग्णांची वाढ
बीड जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून आज पाठवलेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यात 37 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत यात
बीड जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या 600 च्या घरात गेली असली तरी 302 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत तर उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 275 एवढी आहे कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत बीड आणि परळी या दोन ठिकाणी अधिक रुग्ण संख्या असून त्यापाठोपाठ गेवराई अंबाजोगाई आष्टी पाटोदा केज धारूर या तालुक्यात बाधित रुग्णसंख्या आहे तर शिरूर आणि वडवणी याठिकाणी रुग्णसंख्या कमी आहे आतापर्यंत 26 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे यापैकी उपचार घेत असलेले रुग्ण हे सौम्य लक्षण असलेले आहेत यामध्ये केवळ पाच रुग्ण गंभीर लक्षणे असलेली तर आठ रुग्ण हे मध्यम स्वरूपाची लक्षणे असलेली आहेत या पैकी 13 रुग्ण बाहेर जिल्ह्यात उपचार घेत आहेत
नागरिकांनी या परिस्थितीत घाबरून न जाता योग्य उपचार आणि काळजी घ्यावी,प्रत्येक रुग्णालयात रुग्णांची योग्य काळजी घेतली जात असून पॉझिटिव्ह असल्याची भीती देखील मनात बाळगू नये,कुठलीही लक्षणे जाणवू लागल्यास लगेच तपासणी करून उपचार सुरू करावेत,आरोग्य प्रशासन याबाबतीत वारंवार सूचना करत आहे कोरोनाची भीती मनातून काढून टाकावी वेळेत उपचार मिळाले तर रुग्ण बरे होतात याचा अनुभव बरे झालेले रुग्ण घेत आहेत असे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे