सोन्याच्या दरात विक्रमी तेजी:24 तासात 3 हजाराने वाढ

मुंबई : मागील काही दिवसांपासून सातत्यानं वाढणाऱ्या सोन्याच्या दरांना पुन्हा एकदा विक्रमी आकडा ओलांडला आहे. दर दिवशी सोन्याच्या दरांत ठराविक किंमतीनं वाढ होत असतानाच मंगळवारी मात्र या दरांमध्ये विक्रमी तेजी आल्याचं पाहायला मिळालं. सराफा बाजारात सोन्याला आलेली ही झळाळी पाहता मागील चोवीस तासांत हे दर तब्बल ३ हजारांनी वाढले आहेत.

परिणामी मुंबईमध्ये सध्याच्या घडीला हे दर ५४ हजारांच्याही पलीकडे पोहोचले आहेत. कोरोना व्हायरसमुळं लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून नंतरच्या टप्प्यामध्ये ठराविक कालावधीच्या अंतरानं व्यापार सुरु करण्यात आले. पण, अद्यापही संपूर्ण व्यापार सुरु झालेले नाहीत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!