मोठं पाऊल:देशात 5 ठिकाणी होणार कोरोना लशीचं शेवटचं ह्यूमन ट्रायल

नवी दिल्ली, 28 जुलै : जगभरात करोना महासाथ झपाट्याने वाढणं सुरूच असून गेल्या सहा आठवड्यांत करोनाबाधितांची संख्या दुप्पट झाली आहे. अशात ऑक्सफोर्ड-अ‍ॅस्ट्रॅजेनेका द्वारा विकसित कोविड -19 लसीच्या (Oxford-AstraZeneca COVID-19 vaccine) ह्यूमन ट्रायलसाठी अंतिम टप्प्यात देशभरात पाच ठिकाणी पूर्ण तयारी करण्यात आली असल्याची माहिती जैव तंत्रज्ञान विभाग (DBT) च्या सचिव रेणू स्वरूप यांनी सोमवारी दिली आहे. खरंतर हे एक मोठं पाऊल आहे. कारण ज्या भारतीयांना लस (vaccination) दिली जाणार आहे त्यांचा संपूर्ण डेटा उपलब्ध असणं महत्त्वाचं आहे.

लस तयार झाल्यानंतर ऑक्सफोर्ड (Oxford) आणि अ‍ॅस्ट्रॅजेनेका (AstraZeneca) यांनी जगातील सर्वात मोठी लस उत्पादक ‘सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया- एसआयआय’ (Serum Institute of India- SII) ची निर्मिती केली आहे. त्यानुसार, या महिन्याच्या सुरूवातीला प्रथम दोन-टप्प्यातील चाचणी निकाल सादर करण्यात येणार आहे.

खरंतर, ऑक्सफोर्ड युनिवर्सिटीनं तयार केलेल्या लशीच्या पहिल्या दोन चाचणी यशस्वी झाल्या आहेत. तर तिसऱ्या टप्प्यात मुंबई-पुण्यादरम्यान 5000 लोकांवर मानवी चाचणी करण्यात येणार असल्याची माहिती पुण्याच्या सीरम कंपनीच्या सीईओंनी दिली. त्यानंतर आता दुसरी आनंदाची बातमी म्हणजे भारतीय बनावटीची Covaxin ह्या लशीला मानवी चाचणीच्या पहिल्या टप्प्यात चांगलं यश मिळालं आहे.

ICMR-भारत बायोटेक कंपनीने एकत्र येऊन Covaxin ही लस तयार केली आहे. एम्स रुग्णालयात Covaxin लशीची चाचणी सुरू आहे. पहिल्या टप्प्यात संस्थेला 100 स्वयंसेवकांची चाचणी घ्यावी लागते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दिल्ली एम्सच्या चाचणीत भाग घेण्यासाठी सुमारे 3500 लोकांनी नोंदणी केली आहे. यामध्ये 50 टक्क्यांहून अधिक लोक दुसऱ्या राज्यातील असल्याची माहिती मिळाली आहे.

शुक्रवारी एका व्यक्तीला Covaxinची लस देण्यात आली. त्यावर दोन तासांत कोणतीही रिअॅक्शन दिसून न आल्यामुळे दोन तासात घरी सोडण्यात आलं आहे. ज्या लोकांना लस देण्यात आली आहे त्यांना एक डायरीही देण्यात आली आहे. यामध्ये त्यांना लस दिल्यानंतर झालेले बदल किंवा होणाऱ्या रिअॅक्शनच्या नोंदणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 50 लोकांना लस दिल्यानंतर कोणतीही रिअॅक्शन न आल्यानं आता दुसरा टप्पा सुरू करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!